भाग : १४
साक्षीचा फोन वाजला. बराच वेळ तो आत घरात ठेवल्याने त्याच्याकडे लक्ष गेले नाही. अचानक जोराचा वारा सुटला. घराचे पत्रे आवाज करू लागले. बाहेर वासरासोबत खेळत बसलेली साक्षी, सोनल त्या गोंडस वासराच्या बागडण्यात दंग झाल्या. राणूने दोघींना आत बोलवले.
" सोनम, साक्षी ताईला घेऊन आत ये. बाहेर वारं सुरू झालंय ... या आत जेवायला देते. "
साक्षी भानावर आली. तिने अंगणातला खेळ थांबवला. सोनलला घेऊन आत आली. नचिकेत तिला सतत कॉल करत होता. त्यात आणखी भर म्हणून पावसाची रिप रिप सूरु झाली. राणूने फोन वाजल्याचे साक्षीला सांगितले. तोपर्यंत नचिकेतचे तीन ते चार मिस्डकॉल येऊन गेलेले होते. लगबगीने तिने त्याला कॉल केला. सुरवातीला वारा आणि पावसाच्या अडथळ्यांने कॉल काही लागला नाही. सतत प्रयन्त केल्यावर शेवटी लागला आणि तो नचिकेतने उचलला. साक्षीचा जीव भांड्यात पडला. तिने त्याला राणूच्या घरी येण्यास सांगितले. बाहेर वारा आणि पाऊस असे दुहेरी संकट सुरू होते. राणूच्या घरचे पत्रे वाऱ्यामुळे जोरजोरात वाजत होते. नचिकेत अजूनही प्रयोगशाळेतच होता. साक्षी आल्याशिवाय त्याला घरी ही जाता येत नव्हते. घरी साक्षीच्या आजच्या नियोजनाची पुसटशी कल्पना दिली नव्हती. त्यामुळे तिची वाट पाहत तो प्रयोगशाळेत काही जुने काम काढून बसला होता. बाहेरचा वादळी पाऊस आणि बागेत आलेली टपोरी हिरवी द्राक्ष याची ही त्याला काळजी लागलेली होती. साक्षीचा फोन आल्यावर तडक तो तिथून निघाला आणि राणूचे चार भिंतीचे घर गाठले. पावसात गाडी खड्यातून, चिखलातुन काढत नेली.
दारात साक्षी दिसल्यावर त्याने क्षणाचा ही विलंब न करता तिला येऊन बसायला सांगितले. राणूचा निरोप घेऊन ती लगोलग तिथून निघाली. निघताना सोनलला, राणूला घट्ट मिठी मारली. नचिकेतच्या शेजारी जाऊन बसली. गाडीला वरून छप्पर नव्हते त्यामुळे दोघे ही भिजत भिजत घरच्या वाटेने निघाले. सोनलला घेतलेला फ्रॉक आणि राणूने दिलेला खरवस अजून ही गाडीत च होता. थोडे पुढे गेल्यावर साक्षीला त्या फ्रॉक ची आठवण झाली. तिने नचिकेतला सांगितले. नचिकेत तिला म्हणला " उद्या ती येईल तेव्हा दे साक्षी तिला. आज नको. मला हे वातावरण काही ठीक वाटत नाही. आपण घरी जाऊ आता. " साक्षीने मागच्या सीटवर ठेवलेला तो अबोली फ्रॉक पहिला. परत जाण्याची तिची फार इच्छा होती. पण ती काहीच बोलू शकली नाही. पावसाचा जोर आणखी वाढला. पुन्हा बागेचा रस्ता लागला. तिथवर पोहोचे तोवर दोघे ही पूर्ण पणे भिजून गेले होते. नचिकेतने साक्षीकडे पाहिले. ओल्या कपड्यात ती कुडकुडत होती.
प्रयोगशाळेत काही ठेवणीतले कपडे असल्याचे नचिकेतच्या लक्षात आले. त्याने गाडी बाजूला लावून साक्षीला भिजलेले डोके पुसायला सांगितले.पावसाचा जोर कमी होई पर्यंत दोघे तिथेच होते. बाहेर येऊन पावसाचा जोर वाढलेला पाहत उभे होते. तोच तिथे दूरवर गावातील काही लोकांचा गोंधळ ऐकू आला. शेताच्या बाजूने ती आरडा ओरडा करत येत होती. त्यात भानूचा ओळखीचा आवाज साक्षीला लगेच समजला. तिने नचिकेतला तसे सांगितले. नचिकेतने थोडे पुढे जाऊन हाक मारली तोच भानू समोर आला. घाबरलेल्या अवस्थेत तो काही तरी सांगण्याचा प्रयन्त करत होता. बाकीचे लोक मागेच होते. नचिकेतने त्याला पाणी प्यायला दिले. बसायला खुर्ची दिली. तो शांत होणार इतक्यात आणखी रडायला लागला. साक्षी हे सगळे दृश्य पाहून त्या क्षणी घाबरली. पण नचिकेत सोबत असल्याने तिने फारसे चेहऱ्यावर दिसू दिले नाही. नचिकेतने भानूला मिठी मारली. तो नंतर सांगू लागला. बोलताना ही तो थरथरत होता.
" दादा ... दादा ती आपली पायथ्याशी असलेली वस्ती पार गेली ओ... " नचिकेत आणि साक्षी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. आता ते तिथूनच आले होते. त्यामुळे हे ऐकून त्याच्यासाठी पचवणे कठीण होते. भानूला थोडा वेळ देत साक्षी, नचिकेत तिथेच बसले.
साक्षी उठून बाहेर गेली.
क्रमशः
खूप सुंदर जुई
ReplyDeleteThank you 🌿
Delete