साक्षीची सकाळ
साक्षीचे कुटुंब त्रिकोणी तिघांचे. आई वडील आणि ती. रोज एक नवी सुरवात. दिवसाचा तोच तो एक सुरीपणा दूर करत नव्या विश्वात दाखल झालेले तिचे भावविश्व. तिचा स्वप्नवत वाटणारा हा प्रवास आणि त्यासोबत मिळणारे असंख्य अनुभव.
पुढे काय वाढलेले आहे याची कणभर ही कल्पना नसताना तिची होणारी रोजचीच पण नवी सकाळ. शहरातील मोबाईलवरच्या अलार्म पासून सुरू होणारा तिचा दिवस बदलत हळूहळू ओढ्यावरच्या वाहत्या प्रवाहावर येऊन थांबला. दिल खुलास बिनधास्त व्यक्तिमत्व कला कलाने बदलत जाणारा हा कथात्मक प्रवास. एक जबाबदार आणि भावनिक मनाचा असा हा प्रवास. आपल्या पैकी कित्येकांच्या मनात, स्वभावात, आजूबाजूच्या माणसात होताना आपल्याला ही दिसतो. तसाच तिचा प्रवास सुरु झाला तो तिच्या राहत्या घरातूनच. जसे म्हटले आहे, धरणीला ओढ असते ती आकाशाची. आकाशातील ढगांना मात्र पाण्याचे थेंब होऊन बरसायचे असते ते जमिनीवरच. त्यांची धाव सतत मातीकडे. तसेच काहीसे अंतरंग या कथेतील पात्रांचे आहे. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे, आपला परीघ ओलांडून पार जाण्याचे धाडस आणि पुन्हा स्वप्न वत वाटणाऱ्या या प्रवासात परत माघारी येण्याची ओढ. परतीच्या वाटेने खुणावत जाणारा प्रवास. तिचे हे चार भिंतीच्या आतले त्रिकोणी तिघांचे कुटुंब पाहता पाहता मोठे होते. याच प्रवासातली तिची, " साक्षी " ची ही गोष्ट... ओढ्यावरची गोष्ट.
क्रमशः
( वरील कथा मालिका पूर्णतः काल्पनिक असून इतर कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झाली नाही आहे. )